नवी दिल्ली – भोजपुरी इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि भाजप नेते ‘मनोज तिवारी’ यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. ही गोड बातमी स्वतः हा मनोज तिवारी यांनी ट्विट करत आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. मनोज तिवारी यांना पहिली मुलगी असून, ती मुंबईत शिकते.
मेरे घर आयी एक नन्ही परी… I am blessed with a baby girl… जय जगदंबे.. 🙏🙏 pic.twitter.com/JYarVvRf4X
— Manoj Tiwari (@ManojTiwariMP) December 30, 2020
तिवारी यांनी सोशल मीडियावर आपल्या लेकीचा फोटो शेअर करत “मेरे घर आयी एक नन्ही परी… I am blessed with a baby girl… जय जगदंबे…” असं म्हंटलं आहे. सध्या मनोज तिवारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय जीवना पेक्षा मनोज तिवारी भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार म्हणून अधिक लोकप्रिय आहेत.
अभिनेते मनोज तिवारी यांनी 2013 साली भाजपात प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही बनले.