जोसेफ रॉबिनेट बायडन यांनी अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतल्याचं याआधीच स्पष्ट झालं होत. आज त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंम्प यांच्याविरोधात विजय मिळवला आहे. याबाबतचे वृत्त सीएनएनने दिलं आहे.
कोण आहेत बायडन
जोसेफ रॉबिनेट बायडन यांनी बराक ओबामा यांच्या कार्यकाळात 2009 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य असणाऱ्या बायडन यांनी 1973 ते 2009 या काळात डेलवर प्रांताचे प्रतिनिधीत्व 1973 ते 2009 या काळात केले होते.
बायडन यांनी डेलवर विद्यापीटातून पदवीचे शिक्षण घेतले. सॅराकस विद्यापीटातून त्यांनी 1968 मध्ये कायद्याची पदवी मिलवली. डेलवरमधून 1972 मध्ये संसदेत प्रवेश केला. त्यावेळी संसदेतील सर्वात तरूण सदस्य बनण्याचा मान त्यांना मिळाला.
अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीवर त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्याचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवले आहे. 1991 मध्ये झालेल्या आखाती युध्दाला त्यांनी विरोध केला होता. मात्र त्याच वेळी त्यांनी पूर्व युरोपातील नाटो आघाडीला पाठींबा दिला होता. युगोस्लाव्ह युध्दात त्यांनी 1990 मध्ये हस्तक्षेप केला होता. इराक युध्दाच्या ठरावाला त्यांनी 2002 मध्ये पाठींबा दिला होता. मात्र 2007 मध्ये तेथे अमेरिकन सैन्य पाठवण्याला विरोध केला.
संसदीय न्यायिक समितीचे अध्यक्ष म्हणून बायडन यांनी 1987 ते 1995 असे दीर्घकाळ काम पाहिले. त्याकाळात त्यांनी अंमली पदार्थ धोरण, गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरी स्वातंत्र्यावर महत्वपूर्ण काम केले. त्यांनी या काळात त्यांनी हिंसक गुन्हे नियंत्रण आणि विधी अंमलबजावणी कायद्याची निर्मिती केली. महिलांविरोधातील हिंसाचार कायदा निर्माण केला. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यात ते 1988 आणि 2008मध्ये अयशस्वी ठरले.
उपराष्ट्राध्यक्ष असताना 2009 मध्ये आलेल्या अभूतपूर्व मंदीतून सावरण्यासाठी त्यांनी पायाभूत सुविधांवर मोठा खर्च केला. त्यावेळी कर सवलत कायद्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाशी मुस्तद्देगिरीने चर्चा केली आणि तो मंजूर केला. त्यांनी कर्जच्या ओझ्याखअली सापडलेल्या अमेरिकन नागरिकांना सावरण्यासाठी कायदे बनवून मोलाचे योगदान दिले.
अमेरिका – रशीयातील नवा स्टार्ट करारासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लिबियातील लष्करी कारवाईलाही त्यांनी समर्थन दिले. 2011 मध्यते इराकमधून सैन्य माघारी घेण्याचा निर्णयाला त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे यश मिळाले.
एप्रिल 2019 मध्ये बायडन यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. जून 2020 मध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी ऑगस्ट 11 रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांचे नाव जाहीर केले.
हे यश मिळाले असले तरी बायडन यांचे पुर्वायुष्य मात्र फारसे सुखकर नव्हते. बायडन यांचे वडील आधी श्रीमंत होते. मात्र बायडन यांच्या जन्मानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे त्यांचे बालपण आजोळी गेले. 1953 नंतर त्यांच्या वडिलांनी कार विक्रेता म्हणून नाव लौकीक कमावला. त्यानंतर त्यांना मध्यम वर्गीय आयुष्य जगता आले.
बायडन यांनी आपल्या संसद सदस्य म्हणून कारकिर्दीच्या सुरवातील ग्राहक हक्कांच्या रक्षणाकडे लक्ष दिले. 1974 मध्ये त्यांचे नाव भविष्यातील 200 नामवंताच्या यादीत टाईम मासिकाने नोंदवले होते. संसदेतील पहिल्या दशकांत त्यांनी अमेरिकेतील शस्त्र नियंत्रणअसाठी प्रयत्न केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष लेऑनिड ब्रझनेव्ह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्डर यांच्यातील सॉल्ट 2 कराराच्या पुनरूज्जिवनाची चर्चा असफल झाल्यानंतर बिडेन यांनी रशियाच्या परराष्ट्र मत्र्यांची भेट घेऊन अमेरिकेला वाटणारी चिंता त्यांच्या कनावर घालून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता.
बायडन हे पुस्तकी तज्ज्ञ नाहीत. पारंपरिक विाचार करणारे नाहीत मात्र ते एक महान मार्गदर्शक आहेत. वाहन विक्री करताना त्यांना कसे विकावे याचेक्षान जन्मजात मिळाले होते. ती त्यांचू आयरीश देणगी आहे, असे राजकीय लेखक हॉवर्ढ फिनेमन यांनी म्हटले आहे.