ग्रीनलँडमध्ये तुटला बर्फाचा महाकाय तुकडा

कोपेनहेगेन- ग्रीनलँडमध्ये बर्फाच्या पर्वताचा एक महाकाय तुकडा तुटून पडल्याने पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली आहे. उत्तर पूर्व आर्क्टिक क्षेत्रात हि  घटना घडली आहे. नैशनल जिओलॉजिकल सर्वे ऑफ डेनमार्क अँड  ग्रीनलैंडच्या अधिकाऱ्यांनी माहितीप्रमाणे या तुटलेल्या बर्फाच्या तुकड्याचा आकार ११० चौरस किलोमीटर आहे. उत्तर पूर्व ग्रीनलंडमधील बर्फाळ क्षेत्रात वाहणाऱ्या एका हिमनदीच्या टोकाशी असणाऱ्या हिमनगाचा हा तुकडा आहे.

नैशनल जिओलॉजिकल सर्वे ऑफ डेनमार्क अँड  ग्रीनलैंडने दिलेल्या माहितीप्रमाणे जागतिक तापमान वाढीमुळे हिमनग वितळण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. त्यामुळेच  बर्फाचे असे तुकडे मुख्य पर्वतापासून तुटत आहेत १९९९ पासून या विशिष्ट्य पर्वताबाबत अनेकवेळा असे प्रकार घडत आहेत.

आतापर्यंत या हिमनगाचा  १६० चौरस किलोमीटरचा तुकडा तुटून पडला आहे. नैशनल जिओलॉजिकल सर्वे ऑफ डेनमार्क अँड  ग्रीनलॅंडचे  प्रोफेसर जेसन बॉक्स यांच्या मते हि अतिशय चिंताजनक गोष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.