पुणे – कोथरूड येथील झोपडपट्टीत भीषण आग लागली. न्यु लक्ष्मीनगर शास्त्रीनगर येथे आज पहाटे ३ वाजता मोठी आग लागली असून याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.
माहितीनुसार, सात सिलेंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला असून अनेक घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. अग्निशमन गाड्या व पोलीस घटनास्थळी पोहचून ही आग आटोक्यात आणली.