पुणे – रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळील एका बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री 3 वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. परंतु, या आगीत 3 फ्लॅट व 2 दुकाने जळाली असून 1 चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नाही.