बेल्हे (पुणे)- प्रशासनाच्या वतीने बेल्हे (ता. जुन्नर) गावात सर्वेक्षण केले. यातील 81 संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे रॅपीड करोना टेस्टसाठी पाठविण्यात आले होते. पैकी आठजणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेल्हे गावातील मोरया चौक सुतारवाडा येथील 3 रुग्ण, मुक्ताई मंदिर ते बोरी रोडवरील वस्ती 2 रुग्ण, नगर हायवे रुग्ण 2, व बाजारआळी येथे 1 रुग्ण असे एकुण 8 रूग्न करोना पॉझीटीव्ह रुग्ण गावात आढळून आले. तर रानमळा, साकोरी, आणे येथील प्रत्येकी एक रूग्ण करोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष थोरात यांनी दिली.