हॉटेल मालकावर फिल्मी स्टाईल गोळीबार

सुलतानपूर: उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे एखाद्या चित्रपटाच्या कथानकास शोभेल असा गोळीबार करण्यात आला आहे. सुलतानपूर येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने आरोपीची ओळख पटली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुलतानपूर येथील अवंतिका हॉटेल मध्ये रविवारी सायंकाळी हॉटेलचे मालक अलोक आर्या कॅश काऊंटरवर बसले होते. तेवढ्यात पांढरा शर्ट निळी पॅन्ट व गळ्याभोवती गमछा गुंडाळलेला एक इसम शांतपणे काउंटर शेजारी आला, त्याने कंबरेला लावलेले पिस्तूल काढले, आर्या यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या व निघून गेला. हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी त्यांच्या हातावर तुरी देत तेथून सटकला. दैव बलवत्तर असल्याने हॉटेल मालक आर्या या हल्ल्यातून बचावले आहेत
दरम्यान, पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून तो सुलतानपूर मध्ये खाजगी ठेकेदाराचे काम करतो. प्राथमिक चौकशीनंतर पार्सल बाबत वेटर सोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी आपल्या दोन मित्रांसह हॉटेल मध्ये परतला व रागाच्या भरात त्याने हॉटेल मालक आर्या यांच्यावर गोळीबार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)