राजगुरूनगर -गेली तीन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या विळख्यात अडलेकल्या नाभिक बांधवांना अजूनही लॉकडाऊनमध्ये राहावे लागत असल्याने त्यांचा विचार करून खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून नाभिक बांधवांना किराणा किट उपलब्ध करून वाटप करण्यात आले.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राजगुरूनगर शहर व परिसरातील नाभिक बांधवांना गहू, तांदूळ, साखर, डाळ आदी वस्तूंचे किराणा किट व संसर्ग टाळता येईल, असे सुरक्षा किटचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती अरुण चांभारे, बाजार समितीचे उपसभापती धारू गवारी, मयुर मोहिते पाटील, ऍड. सुखदेव पानसरे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब खंडागळे, तालुका नाभिक सलून असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गायकवाड, यांसह दुकानदार यावेळी उपस्थित होते.