Pune | महावीर ग्रुपतर्फे कोविड रुग्णालयांना मदतीचा हात

पुणे (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षापासून महावीर जन्म कल्याणक साजरा होत नाहीये म्हणून यावर्षी कोविड संकटातून बाहेर पडण्यासाठी साहिल सुरज बागमार, प्रतीक दलपतराज ओसवाल आणि टीम यांनी कोविड काळात गरजूंना तसेच मनपा रूग्णालयात आवश्यक वस्तू भेट देत सामाजिक बांधिलकी जपली.

महावीर ग्रुपमधील सदस्यांनी त्यासाठी परिसरातील तसेच इतर भागातील नागरिकांकडून डोनेशन जमा करत गरजूंना मदत करण्याचे ठरविले आणि त्यांच्या या उपक्रमास गरीब व्यक्ती पासून श्रीमंतानी 10 रूपये ते 10 हजार रूपये असे डोनेशन देत मदतीचा हातभार लावत प्रतिसाद दिला. यामध्ये जवळपास 200 व्यक्तींनी योगदान दिले.

महावीर ग्रुपने पुण्यातल्या नगर पालिका हॉस्पिटलमध्ये सर्वक्षण केले की तिथे काय गरज आहे. हॉस्पिटलच्या गरजांनुसार त्यांनी सोनवणे हॉस्पिटल-भवानी पेठ, राजमाता जिजाऊ हॉस्पिटल-मित्र मंडळ चौक आणि रमाबाई आंबेडकर हॉस्पिटल-निलायम टॉकीज या ठिकाणी आवश्यक अशा वस्तू डोनेट केले. तसेच बेबी वॉर्मर, सक्शन मशीन, ऑपरेशन थेटर टेबल, बीपी उपकरणे, फेटल डॉपलर, ऑक्सी मिटर, स्टेथोस्कोप, सैनी टायझर, अशा इतर वस्तूही दिल्या.

महावीर ग्रुपतर्फे आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन पण गरजू लोकांसाठी उपलब्ध केली आहे. त्यासाठी त्यांनी पुढील क्रमांकावर  ९९२२४४५५९३, ७९७२०८१५९३, ८८८८४५४४३६ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.