पुरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा…

सोमेश्वरनगर :  कोल्हापुर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. सध्या पुराचे पाणी ओसरत आहे पण या पुरात ज्यांचा घर, संसार आयुष्यभराची कमाई वाहून गेली आहे त्यांना आपण मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. याचीच जाणीव ठेवून सोमेशवरनगर परिसरातील नागरिक मदतीसाठी सरसावले आहेत.


कोल्हापूर सांगली पुरग्रस्तांना मदतीसाठी आज पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील नागरिक सरसावले आहेत. पुरग्रस्तांना त्यांच्या जीवनावश्‍यक वस्तू देवून त्यांनी आपल्या मदतीचा हातभार लावण्याचे काम केले आहे. या संकलन शिबीरात सोमेश्वरनगर निंबूत, मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, होळसह अनेक भागातील सर्व नागरिकांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. दि : सोमेश्वर पॉलिटेक्‍निक कॉलेजच्यासमोर या संकलन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात आज नागरिकांनी आपला सहभाग नोंदवत जीवनावश्‍यक असणाऱ्या वस्तू म्हणजेच गहू, तांदूळ, डाळी, खाद्यतेल इत्यादींसह अनेक वस्तू देण्यात आल्या आहेत. आज आणि उद्या या संकलन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनी आपला एक मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करण्यात आले आहे.०

Leave A Reply

Your email address will not be published.