मन हेलावून टाकणारी घटना! मुलीने प्रेमविवाह केल्याने बापाने घरातील सात जणांना जिवंत जाळले

लाहोर : मुलीने इच्छेविरोधात लग्न करणं आन त्याचा निषेध म्हणून मुलीच्या माहेरच्या लोकांनी तिच्याशी संबंध न ठेवणे ही फिल्मीस्टाईल वाटत असली तरी आजच्या जगात ही सत्य घटना घडत आहेत. मात्र यापेक्षाही एक क्रूर निर्दयी घटना समोर आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून पित्याने कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पाकिस्तानमधील एका व्यक्तीने त्याच्या दोन मुली आणि चार नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील सात सदस्यांना जिवंत जाळले. मुलीच्या प्रेमविवाहाला आरोपीचा विरोध होता आणि त्या रागातून त्याने हे कृत्य केले. या घटनेत केवळ आरोपीचा जावई बचावला असून इतर सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर हुसेन असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. त्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुझफ्फरगढ जिल्ह्यात राहणाऱ्या मुलींच्या घराला आग लावली. या घरात त्याच्या मुली फौजिया बीबी आणि खुर्शीद माई त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. या आगीत फौजिया बीबी आणि खुर्शीद माई यांच्यासह त्यांचे पती आणि दोघींची चार अल्पवयीन मुले मरण पावली आहेत.

दरम्यान, बीबीचे पती मेहबूब अहमद घरी नसल्याने या घटनेतून बचावले असून त्यांनी सासरे मंजूर हुसेन आणि त्यांचा मुलगा साबीर हुसेन यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. “मी कामानिमित्त मुलतानमध्ये होतो. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा घराला आग लागलेली पाहिली. यावेळी मला मंजूर हुसेन आणि साबीर हुसेन हे दोघंही घटनास्थळावरून पळून जाताना दिसले.” असे मेहबूब अहमद यांनी पोलिसांना सांगितले. तसेच मेहबूब अहमद आणि बीबीने २०२० मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांच्या विवाहाला सासरे मंजूर हुसेन यांचा विरोध होता त्यामुळे ते खुश नव्हते. त्यातूनच त्यांनी घराला आग लावली. या घटनेत मेहमूद अहमद यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

“ही घटना प्रेम विवाहामुळे दोन कुटुंबांमधील शत्रुत्वाचा परिणाम म्हणून घडली आहे. आम्ही दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे,” असे पोलीस अधिकारी अब्दुल मजीद यांनी रॉयटर्सला सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.