पिंपरी – पिंपरीगावातील श्री शितळादेवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ बुधवारी सकाळी सात वाजता करवीर पिठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त सोमवारी (दि.17 ) श्री शितळादेवी मूर्तीची व कलशाची मिरवणूक पिंपरी गावात वाजतगाजत काढण्यात आली.
यावेळी निमंत्रक नगरसेवक संदीप वाघेरे, वसंत दत्तोबा नाणेकर, किसन कापसे, चिंधाजी गोलांडेमामा, चंद्रकांत गव्हाणे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, रामभाऊ कुदळे, हरीश वाघेरे, कैलास वाघेरे, राजेंद्र वाघेरे आदींसह भाविक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात मंगळवारी (18 जून) सकाळी 8.30 वाजता प्रासाद वास्तू मंडल स्थापना, मुख्य देवता स्थापना, कुंड संस्कार, नवग्रह स्थापना, ग्रह होम, वास्तू होम, पर्याय होम, सायंकाळी पाच वाजता सप्तसती पाठ व पूजा मंत्रा पुष्प आणि मुख्य समारंभ बुधवारी (19 जून) सकाळी 7 नंतर स्थापित देवता पूजन, कलश स्थापन, प्रायश्चित होम, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण समारंभ, पूर्णाहूती, महापूजा, महानैवेद्य व सायंकाळी 5 नंतर महाप्रसाद या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.