बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वरा लवकरच एका नवीन वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. या वेब सिरीजबाबत स्वरा म्हणाली, “रसभरी’मध्ये समाजातील अनेक महत्त्वाचे विषय रेखाटले आहेत.
या वेब सिरीजमध्ये अत्याचारी समाजातील ढोंगीपणाची आणि स्त्री लैंगिकतेबद्दल असलेल्या भीतीची झलक पाहावयास मिळेल.यात मेरठची प्रेमकथा दाखवण्यात आली असताना स्वरा एका इंग्रजी शिक्षिकेची भूमिका साकारत आहे.
स्वरा म्हणाली, या सिरीजची खास गोष्ट म्हणजे, ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर ताज्या हवेचा श्वास घेण्यासारखी आहे, ज्यामध्ये बरेच डार्क कंटेट आहेत. एकीकडे ती सर्वांचे मनोरंजन करेल, तर दुसरीकडे ती समाजातील चर्चा होत नसलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकेल.
ती म्हणाली, किशोरवयीन लैंगिकतेप्रमाणेच, अत्याचारी समाजाचा ढोंगीपणा आणि स्त्री लैंगिकतेबद्दल असलेली सततची भीती; परंतु हे सर्व वर्णन एकदम मजेदार पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. मला आशा आहे की लोक त्याचा आनंद घेतील, जेवढे मला ते साकारताना मिळाला. दरम्यान, हा शो ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर दाखविण्यात येणार आहे.