आगरतळा – त्रिपुरा राज्यात करोनाचा प्रसार पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने त्रिपुरा सरकारने येत्या रविवारी संपूर्ण राज्यात एक दिवसाचा पूर्ण लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. बिलबकुमार देव यांनी काल ही माहिती दिली. ते म्हणाले की, करोनाची साखळी तोडण्यासाठी हा पूर्ण 24 तासांचा लॉकडाऊन असेल मात्र त्यानंतर तो वाढवला जाणार नाही त्यामुळे नागरिकांनी गडबडून जाऊ नये किंवा घरात मोठ्या प्रमाणात माल खरेदी करून साठवणूक करू नये.
आपले राज्य सध्या करोनाच्या स्टेज 1 मध्ये आहे ते लवकरच 2 आणि 3 वर जाणार आहे. त्यामुळे त्याच्या सिद्धतेची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. रविवारच्या एक दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण त्रिपुरात एपिडेमिक कायद लागू असेल.
दरम्यान, त्रिपुरात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.25 इतके झाले आहे. 37 लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात करोना रुग्णांची संख्या 1394 इतकी होती.