पुणे – आर्थिक कारणातून झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत दोरीने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) पहाटे सव्वादोन वाजताच्या सुमारास पॉकेट कार्नर आंबेगाव बुद्रुक येथे घडली.
राहूल बबन दांगट (वय 46, रा. शिलाई वर्ल्डसमोर आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सुशांत नारायण आरुडे (वय 30, रा. चिंतमणी अपार्टमेंट, फालेनगर, आंबेगाव बुद्रुक) याला अटक केली आहे. याबाबत विकास बबन दांगट (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरुडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.