दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग

अग्निशामक दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्ली : दिल्लीतलं एम्स रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डला आग लागल्याचं वृत्त समोर येत आहे. या रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी वॉर्डला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या वार्डातील रूग्णांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. ही आग पहिल्या मजल्यापर्यंत आली आहे.

दरम्यान, अग्निशामक दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे. एम्स रूग्णालयच्या बाहेर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे.

माजी अर्थमंत्री अरूण जेटली एम्स रूग्णालयातील न्यूरो केंद्रातील आयसीयू मध्ये दाखल असून ही इमारत एका वेगळ्या जागेत स्थित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.