विनामास्क फिरल्यास 5000 रुपये दंड

मांजरी ग्रामपंचायतीचा निर्णय; प्रादुर्भाव रोखण्यास कडक उपाययोजना

मांजरी – मांजरी बुद्रुक गावात दिवसेंदिवस वाढत असलेला करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परिसरातील रस्त्यावर, भाजी घेताना किंवा दुकानात गर्दी करणारे तसेच विना मास्क फिरणाऱ्यांकडून 500 ते 5000 हजार रुपये दंड वसूल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा धाडसी निर्णय मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने घेतला आहे.

मांजरी बुद्रुक मध्ये करोनाचे आतापर्यंत 81 रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा संसर्ग वाढत असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी गावाच्या बाहेर कामानिमित्त जातात बहुतांशी असे लोक बाधित झाले आहेत. यामुळेच सतर्कता म्हणून आपण कोठे कामाला जातो, काय काम करतो, घरचा पत्ता, फोन नंबर अशी सर्व माहिती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती कळविली नाही तर संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

बैठकीस आय.सी.एम.आर काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकल रिसर्चचे सल्लागार डॉ. सुभाष साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सर्कल गौरी तेलंग, पोलीस अधिकारी मनोज पाटील, मांजरी बुद्रुक आरोग्य केंद्राच्या अधिकारी मनीषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, तलाठी मिलिंद शेटे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, अशा वर्कर व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, रविवारी प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनिल कोळी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, सरपंच शिवराज घुले यांनीही बैठक घेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.