पुणे: अखेर राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुण्यात मैदान मिळाल आहे. राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुण्यात मैदान उपलब्द होत नव्हतं. मात्र आता मैदान मिळालं असून उद्या शुक्रवार पेठेतील सरस्वती संस्थेच्या मैदानात संध्याकाळी ६ वाजता राजगर्जना होणार आहे.
उद्याच्या सभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे नारळ फोडणार आहेत. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी मिळवण्यासाठी मनसेने प्रयत्न केले. मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांची मागणी नाकारली आहे.