हैद्राबाद: नव्यानेच उदघाट्न झालेल्या उड्डाण पुलावरून जात असणाऱ्या कारचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून भरधाव वेगात जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट खाली कोसळली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
हैद्राबाद येथील गाचीबोवली ते बायोडायव्हर्सिटी दरम्यान असणाऱ्या पुलावरून हा अपघात झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला या पुलाचे उदघाटन झाले असून, त्यानंतर हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीला खुला केल्यानंतर हा दुसरा अपघात असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान एकेरी वाहतुकीसाठी असणारा हा पूल ओरिएंसेझपासून सुरु होऊन बायोडायव्हर्सिटी जंक्शन जवळ संपतो. या घटनेचा विडिओ समोर आला असून, अंगावर शहारे आणणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.