वाघोली – हवेली तालुक्यातील बिवरी येथील कै.उमाजी रामभाऊ थोरात यांची कन्या उज्वला थोरात हिची पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. शेतकरी कुटूंबातील उज्वला हिने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शालेय शिक्षण पुर्ण केले.
पोलीस दलात सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी लग्नानंतर सराव करून जिद्धीने पती सासु – सासरे व बिवरी ग्रामस्थ सगळ्यांच्या पाठिंबाने आई – वडिलांच्या कष्टाचे सार्थक करत पोलीस दलात प्रवेश मिळवला आहे. महालक्ष्मी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दत्तात्रय गोते पाटिल व बिवरी ग्रामस्थांच्या वतीने उज्वला थोरात हिचा सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थ व कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेले पाठबळ असल्याचे प्रतिपादन महालक्ष्मी संस्थापक दत्तात्रय गोते पाटील यांनी सांगितले. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळून गावाचे नाव मोठे करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे आवाहन गोते यांनी केले आहे.