मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाच्या प्रवक्त्यावर सुप्रिया सुळे यांचा बनावट फोटो प्रकाशित केल्याबद्दल संबंधितांवर कारवाईची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
काल राष्ट्रवादीच्या एका प्रवक्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करीत असल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे त्यांच्यावर चारही बाजूने टीका सुरू झाली होती.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून काम करीत असल्याचा एक फोटो सोशल मिडीयावर टाकला आहे. हा बनावट फोटो असून त्यावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पोलिसांकडे केली आहे.