वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या सहा वर्षांपासून जन्मदरात कमालीची घट झाली असून यावर्षी गेल्या 112 वर्षातील जन्मदराची नीचांकी नोंद झाली आहे 2019 च्या तुलनेत यावर्षी जन्मदर 4 टक्के घसरला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेने आपल्या ताज्या अहवालात हि माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी जरी करण्यात आलेल्या 99 टक्के जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अमेरिकेत सध्या दर 1000 महिलांमागे 56 ह्या जन्मदर आहे. अमेरिकेतील फर्टिलिटी दरही 2.1 टक्केवरून 1.6 टक्केपर्यंत घसरला आहे.
या अहवालाप्रमाणे गेल्या वर्षी अमेरिकेत 36 लाख मुलांचा जन्म झाला. 2019 मध्ये हा आकडा 38 लाख होता तर 2007 मध्ये हा आकडा 43 लाख होता. अमेरिकेशिवाय इतर काही युरोपीय देशांमध्येही अशी घसरण सुरु आहे. इटलीत गेल्या वर्षी प्रथमच जन्मदरात तब्बल 22टक्के घसरण झाली.