सांगली ; शिराळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

शिराळा (प्रतिनिधी) – रविवारी रात्री फार्म हाऊसवरील तीन कुत्री बाहेर मोकळी सोडली होती. त्यातील एका कुत्र्यावर सोमवारी पहाटे तीनच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. कुत्र्याला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केले.

सोनवडे येथे डी.आर.जाधव यांचे मातोश्री फार्म हाऊस आहे. तेथे राखणीसाठी त्यानी कारवान जातीची कुत्री पाळलेली आहेत.दिवसा हि कुञी बंदीस्त असतात.व रात्रीच्यावेळी त्यांना बाहेर मोकळी सोडली जातात. सभोवताली दाट झाडी, ऊस पिके आहेत.

घटनास्थळी बिबटयाच्या पायांचे ठसे उमटले आहेत.पंधरा दिवसापुर्वी मणदुर येथे पाळीव कुञ्यावर बिबटयाने हल्ला करुन जखमी केले होते. सोनवडे पैकी खोतवाडी येथे चार दिवसापुर्वी बिबटया दगडावर बसल्याचे युवक शंकर मोहीते यांनी माहिती दिली. आठ दिवसापुर्वी आरळा भाष्टेवाडी येथे शेळीवर बिबटयाने हल्ला करुन ठार मारले होते. वारंवार होणाऱ्या बिबटयाच्या हल्ल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. वन विभागाने सापळा लाऊन बिबटयाला जेरबंद करावे अशी मागणी फार्म हाऊसचे मालक डी.आर.जाधव यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.