सप्तरंगाने नटलेले पारदर्शक पंखाचे
खळद वार्ताहर– पावसाळा सुरू झाला की सभोवताली विविध जातीचे आणि रंगांचे फुलपाखरे दिसून येतात. असेच खळद येथे संत सेना महाराजाच्या मंदिरा समोरील तुळशीवृंदावनात सकाळचे कोवळे ऊन घेताना कधीही न पाहण्यात आलेले एक फुलपाखरू दिसले आहे. हे फुलपाखरू एका वेगळ्या जातीचे असून, याचे पंख पूर्ण पणे पारदर्शक पाण्यासारखे स्वच्छ आहेत. हे फुलपाखरू जणू कोवळ्या उन्हात सन बाथ करत असल्याचे जाणवते.