सनी सिंहसोबत एक वेगळाच कम्फर्ट झोन – सोनाली सहगल

अभिनेत्री सोनाली सहगलने अभिनेता सनी सिंहसोबत “प्यार का पंचनामा 2′ आणि “जय मम्मी दी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. सोनाली म्हणतात की, आम्ही एकमेकांचे खुप चांगले मित्र आहे आणि सनीबरोबर काम करताना मला नेहमीच चांगला अनुभव आला आहे.
सनीसोबत सेटवर असलेल्या तिच्या केमिस्ट्रीबद्दल सोनाली म्हणाली, “सनी आणि माझ्यात एक वेगळ्याच लेव्हलवर कम्फर्ट फॅक्टर आहे, जो आमच्याशिवाय इतर को-अभिनेत्याबरोबर नाही. आम्ही चांगले मित्र असल्याने त्याच्याबरोबर काम करणे सहजपणे सोपे झाले आहे.
“प्यार का पंचनामा’मधील आमची केमिस्ट्री अप्रतिम राहिली आणि “जय मम्मी दी’मध्येही ती कायम असल्याचे दिसून आली. दरम्यान, सोनाली सहगलने 13 जुलै रोजी आपला 39वा वाढदिवस साजरा केला. 2005मधील “सारा आकाश’ या टीव्ही शोमधून ती घराघरात पोहचली. याशिवाय “होटल किंग्स्टन’ आणि “जस्सी जैसा कोई नही’ या मालिकांमधूनही तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.





