निर्भया दोषींच्या फाशीला स्थगिती

नवी दिल्ली : निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना एक फेब्रुवारीला देण्यात येणाऱ्या फाशीला दिल्ली न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयाने आपल्याल धक्का बसला असून आरोपीचे वकील एपी सिंग यांनी आपल्या आशीलाला कधीच फासावर लटकवले जाणार नाही, असे आव्हान दिले होते, पण मी लढणे सोडणार नाही असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधिश धर्मेंद्र राणा यांनी या आदेशाला स्थगिती दिली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मुकेश सिंग याच्याकडे कोणताही कायदेशीर पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे त्याल फासावर लटकवता येऊ शकते, असा युक्तीवाद सरकारी वकील इरफान अहमद यांनी केला.

आरोपींचे वकील एपी सिंग म्हणाले, दोषींसाठी आणखी काही पर्याय शिल्लक आहेत. मुकेशने सर्व कायदेशीर प्रकरणे वेळेवर आणि गांभीर्याने पूर्ण केली आहेत. सरकारी वकील म्हणाले, विनय आणि अक्षय यांनी सादर केलेले अर्ज दिल्ली कारगृह कायद्याला धरून नाहीत. मात्र विनयची फाशी पुढे ढकलता येऊ शकते.

आरोपींच्या वकीलांच्या युक्‍तीवादाला पिडितेच्या वकील सीमा कौशिक यांनी विरोध केला. त्या म्हणाल्या न्यायाच्या वेगाला आव्हान देण्यासाठी वेळकाढूपणाच्या युक्‍त्या आरोपींकडून वापरल्या जात आहेत.

तत्पुर्वी या दोषींना स्वतंत्र फाशी देण्यात येईल, त्याची तयारी पूर्ण झाली आहे, असे तिहार कारागृह प्रशासनाने न्यायालयाला कळवले.

निर्भयाच्या आईचा आक्रोश
न्यायलयाने एक फेब्रुवारीला फाशी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देताच निर्भयाच्या आईला आपले आसू आवरता आले नाहीत. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, या आरोपींना कधीही फासावर लटवले जाणार नाही असे आव्हान मला दिले होते. पण मी लढणे सोडणार नाही. आता सरकारने पुढाकार घेत या नराधमांना फासावर लटकवले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.