ह्यूस्टनमध्ये काश्‍मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने मोदींचे मानले आभार

शिख समुदायासह बोहरा समाजाच्या नागरिकांनी घेतली मोदींची भेट

ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज ते ह्यूस्टनमध्ये दाखल झाले असून हाऊडी मोदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेत पोपनंतर परदेशी नेत्याचा हा सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही हजर असणार आहेत. दरम्यान, ह्यूस्टन शहरात पंतप्रधान दाखल होताच काश्‍मिरी पंडितांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्युस्टनमध्ये काश्‍मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली. एका सदस्याने पंतप्रधानांच्या हाताचे चुंबन घेवून, ‘सात लाख काश्‍मिरी पंडितांच्या वतीने मला तुमचे आभार मानायचे आहेत.’ असे म्हटले. तसेच अमेरिकेत पीएम मोदी यांनी ह्युस्टनमधील बोहरा समाजातील सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली.

कॅलिफोर्नियाचे आर्विनचे विद्यमान आयुक्त, अवींदर चावला म्हणाले, ‘आम्ही मोदीजींना निवेदन सादर केले आहे आणि शीख समुदायासाठी काम केल्याबद्दल मोदीजींचे आभार मानले आहेत. आम्ही करतारपूर कॉरिडॉरबद्दल आभार मानले आहेत. राष्ट्रपति ट्रम्प हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी येथे येत आहेत त्यावरून मोदी हे किती महत्वाचे नेते आहेत हे यातून दिसून येते असेही त्यांनी यावेळी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्युस्टनमध्ये स्थायिक झालेल्या शीख समुदायाच्या लोकांशीही भेट घेतली.

अमेरिकन राष्ट्रपती भारतीय पंतप्रधानांसह भारतीय-अमेरिकन समुदायाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही पहिली वेळ असणार आहे. एनआरजी फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमास सुमारे 50,000 भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.