पारंपरिक औषधांचा डेटाबेस निर्माण होणार

आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषध प्रणाली भारतात फार पुर्वीपासून वापरली जात आहे. जागतिकीकरणाच्या या युगात, त्यांच्या क्‍लिनिकल सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत असा एक गैरसमज आहे की “नैसर्गिक असणारी सर्व औषधे सुरक्षित आहेत हा गैरसमज आहे. ही औषधे जर वेळेत घेतली नाही किंवा खूप दिवसांनी घेतली तर त्यांचा विपरित परिणाम होऊ शकतो पण याबाबतचा कुठलाही डेटा अस्तित्वात नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा याबाबत शंका उपस्थित केली आहे.

आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी ही उपचार पद्धतीन अत्यंत जुनी असली तरी त्यांचा कुठलाही डेटा अस्तित्वात नाही. त्यामुळेच भारताच्या आयुष मंत्रालयाने आता या संबंधित डेटा गोळा करण्यासाठी नॅशनल फार्माकोविजिलेन्सची स्थापना केली आहे. त्याचे एक केंद्र नुकतेच भारती विद्यापीठातील आयुर्वेद विभागात सुरु करण्यात आले आहे. फार्माकोविजिलेन्स म्हणजे विज्ञान आणि प्रतिकूल परिणाम किंवा इतर कोणत्याही औषधाशी संबंधित समस्यांचे निदान, मूल्यांकन, समजून घेणे.

आज हर्बल औषधांच्या सुरक्षेबाबत सुद्धा मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.अशा वेळी हे फार्माकोविजिलेन्स केंद्र उपयुक्त ठरु शकते, या केंद्रातील डेटा मार्फत आपण औषधांची माहिती मिळवू शकणार आहे.

आज पारंपारिक औषधे ही सुरक्षित आहेत याबाबत सर्वसामान्य व्यक्ती किंवा डॉक्‍टर ठाम असले तरी त्या औषधांची पूर्ण माहिती असणे सुद्धा आवश्‍यक आहे.त्यामुळेच आगामी काळात नॅशनल फार्माकोविजिलेन्स उपयुक्त ठरणार आहे. भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालय, पुणे हे फार्माकोविजिलन्स केंद्र आहे. आयुर्वेद औषधांच्या दुष्परिणामांबद्दल प्रश्‍न आहेत त्यांनी संपर्क केल्यास नक्कीच माहिती गोळा होऊ शकते.

– डॉ.मानसी मकरंद देशपांडे
(9822493019)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.