तोतरबेट येथील कृषी पर्यटन केंद्र अस्सल गावारान चवीसाठी प्रसिद्ध
आळेफाटा – आषाढ महिन्याचे शेवटचे काही दिवस बाकी असताना व्हेज बरोबरीनेच नॉनव्हेज खवय्यांनी “बाजींद… बेत गावचा’ या तोतरबेट (पिंपळवंडी, ता. जुन्नर) येथील कृषी पर्यटन केंद्रावर तोबा गर्दी केली आहे.
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका असलेला जुन्नर तालुका. जुन्नरला लाभलेले ऐतिहासिक महत्त्व आणि वैविध्यपूर्ण निसर्ग याकडे महाराष्ट्रच नाही तर जगभरातील पर्यटक आकर्षित होतात. अशा या तालुक्यातील गावची संस्कृती आणि गावचं जेवण याची उत्तम सांगड “बाजिंद… बेत गावचा’ ही कृषी पर्यटन संकल्पना घालून देते.
गावरान घरगुती पद्धतीचे चुलीवर शिजवलेले शाकाहारी व मांसाहारी जेवण जुन्नर तालुक्यातील खवय्या बरोबरीनेच महाराष्ट्रभरातील चोखंदळ खवय्यांसाठी एक पर्वणीच ठरलेली आहे. एमटीडीसी व जुन्नर टुरिझम रजिस्टर मान्यताप्राप्त असून अत्यंत माफक दरात राहण्याची सोय व खवय्यांसाठी व्हेज नॉन व्हेज जेवणाचा अनमोल खजाना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाला. यामुळे महाराष्ट्रभरातून पर्यटक किल्ले, घाट, देवस्थान यांना भेट देण्यासाठी पुणे मुंबई शहराबरोबरीनेच महाराष्ट्रातून जुन्नर तालुक्यात येत आहे. त्यांची आवड पाहून ट्रेकिंग, लेणी अभ्यास, पारंपरिक व आधुनिक शेती, देवदर्शन, किल्ले अभ्यास, कृषी पर्यटन असे पर्यटनाचे पॅकेज व त्या सर्वांसाठीच “बाजिंद… बेत गावचा’मध्ये चविष्ट, स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी कुटुंबासह येत आहेत. येथे जेवणाची अप्रतिम चव व उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. हॉटेल व्यावसायिक असलेले अक्षय व प्रणव मंडलिक कुटुंबीय यांनी त्यांच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या उच्च शिक्षण आणि ग्राहकांना लागणाऱ्या घरगुती चविष्ट झटका यांचा उत्तम संगम साधलेला आहे.
शाकाहारी, मांसाहारीसाठी स्वतंत्र किचन
शाकाहारी जेवण तसेच मांसाहारी जेवण यांचे स्वतंत्र किचन असून विविध नावीन्यपूर्ण रेसिपीज ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. त्यामुळे निश्चित “बाजिंद बेत गावचा’ याला भेट देऊन अस्सल गावरान जेवण आणि परिसराचा मनसोक्त आनंद घ्यावा. श्रावण महिन्यातही शाकाहारी तसेच उपवासाचे उत्कृष्ट पदार्थ खवय्यांना मिळतील, असे प्रणव मंडलिक यांनी सांगितले.