सिव्हिलमधून पलायन केलेला कोरोना बाधित रुग्ण सापडला

सातारा(प्रतिनिधी) : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमधून पलायन केलेला ६० वर्षीय कोरोना बाधित रुग्ण खटावमध्ये सोमवारी दुपारी सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरातील एका ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, सोमवार, दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास संबंधित कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले होते.या प्रकाराची माहिती शहर पोलिसांनाही देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी थेट त्याच्या घरी गेले. मात्र संबंधित रुग्ण त्याच्या घरी गेला नसल्याचे समोर आले. पै पाहुण्यांकडेही पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र गत पंधरा दिवसांपासून हा कोरोना बाधित रुग्ण आढळून येत नव्हता. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले होते.

दरम्यान, संबंधित कोरोना बाधित रुग्ण खटावमधील नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित नातेवाईकांशी संपर्क साधून रुग्णाला तत्काळ सिव्हीलमध्ये घेऊन येण्याच्या सुचना केल्या. मात्र संबंधित रुग्णाला वाहन उपलब्ध न झाल्याने मंगळवारी सकाळी कोरोना बाधित रुग्ण स्वतः सिव्हिलमध्ये येणार असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.