मुंबई – अर्चना पूरण सिंग मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. अर्चना बहुगुणसंपन्न असून तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलीकडेच तिच्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील सहकलाकार अभिनेता आमिर खानच्या घरी दिसली होती. यावेळी कपिल शर्मा देखील आमिर खानच्या घरी उपस्थित होता.
अभिनेत्रीने आता त्या संध्याकाळची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे व्हिडीओमध्ये कपिल शर्मा एक सुंदर गझल गाताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये कपिल शर्मा त्याच्या गायनाचे कौशल्य दाखवताना दिसत आहे. तो गुलाम अली यांचे ‘हंगामा है क्यूं..’ गाताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे बॉलीवूड अभिनेता आमिर खान कपिलला त्याच्या गझलवर टाळ्या वाजवून प्रोत्साहन देताना दिसत आहे.
View this post on Instagram
तर इतर लोकही गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. स्वतः कपिल शर्मा आणि अर्चना पूरण सिंग यांनी हे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
फोटो पोस्ट करत कपिलने लिहिले की, “अद्भुत संध्याकाळ, सुंदर आदरातिथ्य, प्रेम, हशा, संगीत, किती सुंदर आणि संस्मरणीय भेट झाली याबद्दल धन्यवाद, धन्यवाद आमिर खान भाई..!’ असं तो म्हणाला आहे.