न्यूझिलंडमधील ऑकलंड शहरात पूर्णपणे लॉकडाऊन लागू

वेलिंग्टन – न्यूझिलंडमधील ऑकलंड शहरात करोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात येईनाशी झाल्यामुळे या शहरात 21 सप्टेंबर पर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज ऑकलंड शहरात करोनाचे 33 नवीन रुग्ण आढळले आहेत.

अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर हे कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे न्यूझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटले आहे.

“प्रत्येकाचा जीव आतापर्यंत धोक्‍यात होता. आतापर्यंत केलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले आहेत. आता आणखीन धोका वाढवण्याची आमची ईच्छा नाही.’ असे पंतप्रधान आर्डर्न यांनी सांगितले. ऑकलंड शहरामध्ये चतुर्थ श्रेणीची सर्वोच्च निर्बंधांची पातळी लागू असणार आहे, असेह त्या म्हणाल्या.

न्यूझिलंडमधील अन्य शहरांमध्ये द्वितय श्रेणीचे निर्बंध लागू असतील. या ठिकाणी केवळ खबरदारी म्हणून नागरिकांवर निर्बंध असणार आहेत. या निर्बंधांची मुदत पुढील आठवड्यापर्यंतच असणार आहे.

जोपर्यंत ऑकलंडमध्ये धोका कायम असेल तोपर्यंत अन्य शहरांनाही धोका कायम असेल. म्हणूनच अन्य शहरांनाह सतर्कतेसाठी निर्बंध लागू करावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या.
न्यूझिलंडमध्ये गाल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातून करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. आतापर्यंत 955 रुग्ण सापडले असून 21 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 4 जण अतिदक्षता विभागामध्ये आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.