नवी दिल्ली- मोदी सरकार अनेक योजनांचे नामांतर करत आहे. यामध्ये दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्य नावाणे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाची शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी हा प्रस्थाव मंजूर करण्यात आला. यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या नावाने महाविदयालय-सेंटर्स असणार आहेत.
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर पी. सी. जोशी म्हणाले,’ ज्या नावांना मंजुरी मिळाली आहे, ती नावे समाजातील त्यांच्या योगदानाच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच, विहित प्रक्रियेचे पालन करूनच, परिषदेने या नावांना मंजुरी दिली आहे.’
ते पुढे म्हणाले,’हा निर्णय योग्य आहे, सावरकर हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमान येथे आजही सेल्यूलर जेल आहे, जेथे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. अंदमान येथे गेलो असता, त्या सेल्यूलर जेलला भेट दिली होती. तेव्हा स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे जाणवले