बलात्कार पीडितेला धमकावल्या प्रकरणी धर्मगुरूची हकालपट्टी

केरळ येथील एका ख्रिश्‍चन ननने एका जेष्ठ धर्मगुरूवर बलात्काराचे आरोप लावले होते. ४६ वर्षीय महिलेने लावलेल्या आरोपांनुसार या बिशपने २०१४ ते २०१६ दरम्यान १३ वेळा बलात्कार केला असल्याचे म्हंटले होते. याप्रकरणात आता महिलेने आणखीन एक धक्कादायक खुलासा केला असून फादर जेम्स नावाच्या धर्मगुरूने आपल्याला फोन करून “बलात्काराची तक्रार मागे घे, तुला घर, जागा व पैसे देतो” अशी लालच दाखविल्याचा आरोप केला आहे.
चर्चने एका अधिकृत वक्तव्यामध्ये “आपला या प्रकरणाशी संबंध नसून, चर्चने फादर जेम्स यांना त्यांच्या पदावरून मागे हटण्याचे आदेश दिले आहेत”, असे म्हंटले आहे. दरम्यान या संदर्भातील एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाले असून यामध्ये पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्यात येत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)