बंगळुरू – कर्नाटक सरकारमध्ये खांदेपालट होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या जागी नवा चेहरा देणार असल्याची चर्चा कर्नाटक भाजपमध्ये सुरु असल्याचं कळतं. मात्र मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा सपशेल नाकारत राज्यात पर्यायी चेहराच नसल्याचं काही दिवसांपूर्वी म्हंटल होत.
अशातच आज बेककिना कलमात्तो मठाचे मल्लिकार्जुन मुरुगराजेंद्र स्वामी यांनी राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांना थेट विरोध करत आपला पाठिंबा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी, जर येडियुरप्पा यांना हटवण्यात आले तर ते राज्यासाठी करोना पेक्षाही अधिक धोकादायक ठरेल असा दावा देखील त्यांनी केला.
“राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा करोना विषाणू महासाथीचा समर्थपणे सामना करत आहेत. राज्यातील बाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करतायेत. राज्यातील जनतेनेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. दशकांच्या कठोर मेहनतीनंतर व रस्त्यावरील संघर्षानंतर त्यांनी हे पद प्राप्त केले आहे. भाजप नेतृत्वाने येडियुरप्पा यांच्या कठोर मेहनतीचा व त्यांच्या लोकांना आपल्यासोबत जोडून घेण्याच्या कौशल्याचा आदर करायला हवा.” अशी स्पष्ट भूमिका मल्लिकार्जुन मुरुगराजेंद्र स्वामी यांनी मांडली.
“कोणीही राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करता काम नये. राज्यात नेतृत्वबदल केल्यास ते करोनापेक्षाही अधिक धोकादायक ठरेल.” असंही ते म्हणाले.
बेककिना कलमात्तो मठाला आज मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी भेट दिली होती. यावेळी माठातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
No one should intervene in functioning of govt. Leadership change in Karnataka will be more dangerous than Corona. We must appreciate BS Yediyurappa’s effective efforts in tackling crises.Seers of Shivamogga are with him: Mallikarjuna Murugha Rajendra, Bekkin Kal Mutt,Shikaripura pic.twitter.com/S3GcOzMAP9
— ANI (@ANI) June 12, 2021