Maharashtra Guardian Minister | महायुती सरकारच्या खाते वाटपानंतर पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. अखेर मागील काही दिवसांपासून दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी शनिवारी जाहीर झाली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत.
तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंकत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. यासह महायुती सरकारने मंत्री पदाच्या खातेवाटपाप्रमाणे पालकमंत्रीपद हे चार लाडक्या बहिणींना देखील सोपवले आहे. पंकजा मुंडे, अदिती तटकरे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. अदिती तटकरेंकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा असणार आहे. तर मेघना बोर्डिकर यांच्याकडे परभणीचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले. तर माधुरी मिसाळ कोल्हापुरच्या सहपालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. Maharashtra Guardian Minister |
पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्रीपदापासून दूर
पंकजा मुंडे या पर्यावरण खात्याच्या मंत्री असून त्यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची देखील मागणी देखील केली जात आहे. त्यामुळे त्यांचा बीडच्या पालकमंत्रीपदावरुन पत्ता कट झाला आहे. यासोबतच धनंजय मुंडे यांच्या बहीण बहिण पंकजा मुंडेंनाही बीडच्या पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. Maharashtra Guardian Minister |
रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा अदिती तटकरेंकडे
तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन देखील अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळाले. भरत गोगावले याआधी अनेकदा पालकमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली होती. मंत्रीमंडळात त्यांच्याकडे रोजगार हमी हे खाते असून त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा अदिती तटकरेंकडे सोपवण्यात आले आहे. तर मेघना बोर्डिकर यांच्याकडे परभणीचे पालकमंत्रीपद आणि माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापुरचे सहपालकमंत्री देण्यात आले आहे.