पुणे ; सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने सिंहगड रस्ता परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे कार्यक्रमात वर्गणी कोण जास्त देणार, यावरुन व्हाटसअॅप ग्रुपवरील वादावादीतून गोळीबार झाला होता. त्याला आता आणखी एक वळण लागले असून त्यात गोळीबार करणार्या व्यावसायिकाकडून खंडणी वसुल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत संतोष सेवू पवार (वय ३५, रा. बावधन) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश बद्रिनाथ राठोड आणि देवा ऊर्फ देविदास सोमनाथ राठोड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. देवा राठोड याला अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हा पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये रोहिदास चोरगे जो तिसरा व्यक्ती आहे. याच्या विरुद्ध फिर्यादी संतोष पवार यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. भविष्यात फिर्यादीला त्रास होऊ नये, याकरीता रमेश राठोड गोळी लागलेला जखमी आरोपी. याला फिर्यादी संतोष पवार यांनी मध्यस्थी करण्यास सांगितले होते. त्यात राठोड याने मध्यस्थी केली, म्हणून जुलै २०१५ पासून आजपर्यंत वेळोवेळी भेटून पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५ ते ६ लाख रुपये रोखीने वसुल केले आहे. मंगळवारी रात्री गोळीबार झाला, त्यावेळी आरोपींनी या व्यावसायिकाकडे पैशाची मागणी करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत.