नेवासा – तालुक्यातील कुकाणे गांवच्या एका सर्वाधिक खपाचा दावा करणाऱ्या एका दैनिकाचा पत्रकार सुनिल गर्जे आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे,की राहुरी तालुक्यातील जानकू कोकरे यांनी यासंदर्भात दि.११ मे २०२२ रोजी फिर्याद दिलेली होती.त्यानंतर तीन महिन्यांनी पत्रकार गर्जे आणि पोलीस निरीक्षक गर्जे यांच्या विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुरीचे कोकरे यांच्या नातेवाईकांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याच्या अनुषंगानं कारवाई न करण्यासाठी पत्रकार सुनिल गर्जे याच्या सांगण्यावरुन पोलीस निरीक्षक पोवार यांनी कोकरे यांच्याकडून दीड लाख रुपयांची खंडणी स्विकारली. त्यानंतर ही दीड लाख रुपयांची रक्कम पत्रकार गर्जे यांनी पुन्हा फिर्यादी कोकरे यांना परत दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त नगर जिल्ह्यात वार्यासारखे पसरले आणि यामध्ये पोलिस निरिक्षकांसह पञकारावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलासह पत्रकारितेत प्रचंड खळबळ उडाली.
पञकार सुनिल गर्जे व नेवासा पोलिस ठाण्याच्या तत्कालिन पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्यावर नेवासा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यासह राज्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच प्रकाशझोतात असणाऱ्या नेवासा पोलीस ठाणे पुन्हा एकदा पञकार गर्जे आणि पीआय पोवार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.