तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी केडीसीसी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल

कोल्हापूर – माजनाळ (ता . पन्हाळा ) येथील एका तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी राजेंद्र आनंदा बेलेकर रा. कळे , (बँक निरीक्षक, केडीसीसी क, शाखा पुनाळ) व नामदेव गुंडा खोत रा. खोतवाडी (शाखाधिकारी, केडीसीसी क) या संशयितांवर कळे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मयताचे वडिल बाळासाहेब भिवा डवंग रा. माजनाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली.

कळे पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, माजनाळ येथील मयत जय बाळासाहेब डवंग यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून डेअरी फार्म साठी केडीसीसी बँक शाखा पूनाळ कडे कर्ज प्रकरण दाखल केले होते.

कर्ज प्रकरणास तीन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली होती. परंतु पुनाळ (ता. पन्हाळा) येथील केडीसीसी बँक शाखेत कार्यरत असणारे बँक निरीक्षक राजेंद्र आनंदा बेलेकर व शाखाधिकारी नामदेव खोत गेले तीन महिने पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. पैसे न देण्यामागे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नव्हते. त्यामुळे मयत जय हा तरुण तणावाखाली होता. याच निराशेतून त्यांनी दि. 20 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले.

कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात त्यांचेवरा उपचार सुरु होते, परंतु 23 ऑगस्ट रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत राजाराम पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान मयत जयचे वडील बाळासाहेब डवंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित दोघांवर कळे पोलिसात मंगळवारी (दि.१४) गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे अधिक तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.