औरंगाबाद – निवडणूक प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य आता त्यांना चांगलंच भोवण्याच्या मार्गावर आहे. कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांना तक्रार दिली असून हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात कन्नड पोलीस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख राममहेंद्र डोंगरदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भादवि कलम 188 प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तीन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी प्रचार सभेदरम्यान उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरले होते. तेव्हापासून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढावून घेतली. या प्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरुद्घ शिवसेनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
औरंगाबादेतल्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नगसेवक राज वैद्य यांनी ही तक्रार दिली आहे. शिवीगाळ, शिवसैनिकांच्या भावना दुखावणं, जातीय भावना भडकावल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.