चिखली – भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्याविरुद्ध करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता कॉंग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर चिखली पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॉंग्रेसने या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. याकार्यक्रमात मोठ्याप्रमाणात गर्दी करण्यात आली होती.
काँग्रेस नेत्या व मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्याप्रमाणात गर्दी करण्यात आली असून करोना नियमांचा भंग करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग झाला असून नगराध्यक्षांचे पती कुणाल बोंद्रे, काँग्रेस तालुकाअध्यक्ष समाधान सुपेकर, गोपाल देव्हडे, ज्योतीताई पडघान, अ. रफिक अ. कादर, अतहरोद्दीन काझी, नगरसेवक दीपक खरात, मो. इसरार, सुनील कासारे, बाळू साळोख, नंदू सवडतकर, मो. आसिफ, सुरेंद्र ठाकूर, विनोद पहाड, विष्णू पाटील कळसुंदर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.