शिवसेनेचे राठोड यांच्यासह 80 जणांविरोधात गुन्हा दाखल

जमावबंदी आदेशाच्या उल्लघंनप्रकरणी कारवाई

नगर: केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येला वर्ष झाले. त्यामुळे केडगाव येथे शिवसेनेने रविवारी रात्री कॅंडल मार्च काढला. या मार्चला कोणतीही विनापरवानी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह चार नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह 80 जणांविरुध्द जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी सचिन गोरे यांनी फिर्याद दिली आहे.

निवडणुकीच्या वादातून केडगाव येथे संजय कोतकर, वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाली होती. या घटनेला रविवारी एक वर्ष झाल्याने शिवसेनेने केडगावमधून कॅंडल मार्च काढून श्रध्दांजली अर्पण केली. केडगाव वेस येथून केडगाव गावठाण, अंबिका बसस्टॉप. शाहूनगर मार्गे, मुळे कॉलनी, सुवर्णानगर असा कॅंडल मार्च काढण्यात आला होता. या रॅलीत माजी आमदार अनिल राठोड, दक्षिणचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, अमोल येवले, विजय पठारे, संभाजी कदम, राजेंद्र पठारे यांच्यासह 70 ते 80 जण मार्चामध्ये सहभागी झाले होते. परंतु मार्चासाठी कोणतीही पूर्वपरवानगी पोलिसांकडून घेण्यात आली नव्हती. विना परवानगी मार्च काढून जिल्हादंडाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे सर्वांविरुध्द कोतवाली पोलिस स्टेशनला जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.