मुंबई – गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत ठाकरे गट आणि शिवसेनेत झालेल्या राड्याच्या प्रकरणात सदा सरवणकर यांच्यावर आर्म्स ऍक्टसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:चं शस्त्र दुसऱ्याला दिल्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
गणपती विसर्जनावेळी प्रभादेवी येथे ठाकरे गट आणि शिवसेनेत झालेल्या राड्यावेळी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तुलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
आमदार सदा सरवणकर यांचा शस्त्र परवाना रद्द होणार असल्याची माहिती, गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. सरकारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना क्लिन चिट दिली गेल्याचे आरोप, विरोधकांकडून होत होते. आता यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सरवणकर यांच्यावर आर्म ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सभागृहात सांगितले.