Accident News – कारचा दुचाकीला धक्का लागल्यामुळे कार चालकाची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना मुंबईच्या गोवंडीमध्ये घडली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, आदिल खान ( वय 35) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो गोवंडीच्या शिवाजी नगर भागातील बैंगनवाडी येथे राहत होता. शनिवारी रात्री आदिल हा त्याच्या कारने घराच्या दिशेना निघाला होता. पण रस्त्यात त्याच्या कारचा धक्का रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या एका कारला लागला.
त्यानंतर ही दुचाकी तिथे असणाऱ्या अन्य एका महिलेच्या अंगावर पडली. यामुळे सदर महिला किरकोळ जखमी झाली. यावेळी आदिल व त्या महिलेत वाद झाला. त्यानंतर हे भांडण थांबले.
पण त्यानंतर या महिलेच्या दोन्ही मुलांनी आदिल यांच्या घरी जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. त्यात आदिल गंभीर जखमी झाला. त्याला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.