पिंपरी – बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या दरवाजाची काच तोडून कंपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे दागिने आणि रोख रक्कम असा 4 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.14) सायंकाळी पाच ते गुरुवार (दि.16) या दरम्यान भोसरी, इंद्रायणीनगर येथील “लक्ष्मीकुबेर’ बंगल्यात घडली.
याप्रकरणी शांताराम धोंडिबा चोरघे (वय 65, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शांताराम हे आपल्या बंगल्याला कुलुप लावून मंगळवार (दि.14) मे रोजी सायंकाळी बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या दरवाजाची काच तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरुममधील दरवाज्याचे लॉक तोडून घरात लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे दागिने आणि रोख रक्कम असा 4 लाख 64 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. काल गुरूवारी सकाळी शांताराम चोरघे हे घरी परतल्यांनतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यांनतर या त्यांनी तक्रार दाखल केली.