A ‘bunch of shoes’ gift । देशात सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. त्यासोबतच देशातील प्रत्येक राज्यात प्रत्येक पक्षाकडून वेगेवेगळ्या पदासाठी निवडणूक होत आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रणाम व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका नेत्याला बुटांचा गुच्छ भेट देण्यात येत असल्याचे दिसत आहे.
निषेध म्हणून ‘बुटांचा गुच्छ’ भेट A ‘bunch of shoes’ gift ।
उत्तर प्रदेशाच्या कानपूरमधील हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होताच गोंधळ उडाला. यावेळी, निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रभारीसमोर घोषणाबाजी केली आणि निषेध म्हणून त्यांना ‘बुटांचा गुच्छ’ भेट दिला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कानपूरमधील भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रतापगडचे माजी खासदार आणि भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस संगमलाल गुप्ता यांना प्रभारी बनवण्यात आले आहे. यावरून हा सर्व गोंधळ निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप माजी विभागीय अध्यक्षांनी केला. त्यांनी सांगितले की, ‘पदांसाठी अर्ज करूनही कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध इतर पदे दिली जात आहेत. जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले.
निवडणूक प्रभारी संगमलाल गुप्ता कार्यालयात पोहोचताच, कर्नलगंज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यांनी “आम्ही दलितांचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणा दिल्या. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून नेत्यांनी कामगारांना समजावून सांगितले, त्यानंतर संतप्त कामगार शांत झाले आणि परतले.
मतदान झाले नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप A ‘bunch of shoes’ gift ।
मंडल अध्यक्ष आणि जिल्हा प्रतिनिधी निवडीसाठी अर्ज आणि मतदान प्रक्रिया पाळली पाहिजे, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, परंतु यावेळी अर्ज घेतल्यानंतरही मतदान झाले नाही आणि थेट राज्यस्तरावरून पदांची घोषणा करण्यात आली. यामुळे कामगारांमध्ये संताप वाढला.