क्षणात बॉम्ब शोधणारा पोर्टेबल सेन्सर विकसीत

बिनॉय माटी आणि प्रियदर्शन डे या शास्त्रज्ञांनी लावला शोध

नवी दिल्ली: गेल्या काही काळापासुन भुसुरूंगांमुळे अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा प्रकारचे भुसुरूंग उघड्या डोळ्यांना दिसणे अवघड असल्याने या पद्धतीचा वापर नक्षलवादी आणि अतिरेक्‍यांकडून वाढला होता. मात्र, आता आशा प्रकारची स्फोटके क्षणात शोधणाऱ्या पोर्टेबल सेन्सरचा शोध आयआयटी मधिल वैज्ञानीक बिनॉय माटी आणि प्रियदर्शन डे यांच्या टीमने लावला आहे.

डीएनटी आणि टीएनटी ही केमिकल्सने बनवलेली स्फोटके सामान्य नागरिकांच्या तसेच सैन्याच्या जिवासाठी आणि वातावरणासाठी धोकादायक असुन या प्रकारच्या स्फोटकांचा वापर गेल्या काही काळा पासुन वाढला होता. मात्र आता या सेंसरमुळे त्यांचा शोध घेण्यात भरपुर मदत होणार आहे. हे सेन्सर खुप छोटे असुन ते कोठेही घेऊन जाता येते. त्यामुळे त्याच्याद्वार स्फोटकांचा शोध घेण्यास भरपुर मदत मिळणार आहे.

या संदर्भात माहिती देताना आयआयटीचे प्राध्यापक सौमित्र सत्पथी म्हणाले की, डीएनटी, टीएनटी आणि टीएनपी या केमिकल्सने बनवलेल्या स्फोटकांचा वापर गत काही काळापासून वाढला असुन हे सेन्सर अशा प्रकारच्या स्फोटकांचा शोध तात्काळ घेइल. ज्यामुळे पुढे येणारा धोका लक्षात येइल आणि लोकांना तसेच सैन्यातील जवानांचा प्राण वाचवणे सोपे जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)