नवी दिल्ली – तामिळनाडूतील एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. येथील एका तरूणाने चक्क एक-एक रुपयांची 2.6 लाख रुपयांची नाणी जमा करून स्वप्नातील बाईक खरेदी केली आहे. बाईक खरेदी करण्यासाठी 2.6 लाख रुपयांची नाणी घेऊन तो शोरूममध्ये पोहोचला. तेथे लाखोंची नाणी पाहून सर्वजण दंग झाले होते. नाणी मोजता मोजता शोरूम मधील कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. ही रोकड मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल 10 तास वेळ लागला.
Tamil Nadu | A youth in Salem paid Rs 2.6 lakh to buy a bike with Re 1 coins he collected in three years. pic.twitter.com/ayLgBa23Ja
— ANI (@ANI) March 28, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, व्ही बुपती असे या तरुणाचे नाव असून तीन वर्षांपूर्वी त्याने बजाजची डोमिनार 400 बाइक घेण्याचे स्वप्न पाहिले होते. तेव्हा बाईकची किंमत 2 लाख रुपये होती, पण ती विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पण, त्याने बाईक विकत घेण्याचा निर्धार केला आणि एक-एक रुपया जमवायला सुरुवात केली. अखेर त्याने गाडीसाठी लागणारी सर्व रक्कम जमवली आणि एक-एक रुपयाची 2.6 लाखाची नाणी देऊन त्याने बाईक खरेदी केली. त्याचा बाईक घेण्याचा हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.