श्रीनगर : श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांनी गुरूवारी बॉम्ब फेकले. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली. दहशतवाद्यांनी लाल बझार पोलिस ठाण्याच्या दिशेने बॉम्ब फेकले. ते तेथे साठलेल्या कचऱ्यावर पडले. त्यात एक पोलिस किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, या स्फोटाचा उल्लेख पोलिसांनी विचित्र स्फोट असा केला आहे. साठलेल्या कचऱ्यात विचित्र स्फोट झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान बुधवारी शाल्तेंग येथे बुधवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी एक जवान शहीद झाला. एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले. दरम्यान अटक केलेल्या दहशतवाद्याच्या कुटुंबियांनी त्याचा दहशतवाद्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. तो पोलिस आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत जखमी झाला, असे म्हटले आहे.