पुणे: सर्वाधिक धोकादायक अवस्थेत असलेला पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळढोक म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड पक्षाबाबत एक आनंदाची बातमी वनविभागाकडून देण्यात आली आहे.
सोलापूर येथे नुकतेच एका स्त्री जातीचा माळढोक पक्षी आढळला आला आहे. माळढोक संवर्धनाबाबत सकारात्मक चित्र निर्माण झाल्याने, पर्यावरणप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
रविवारी (दि.8) सोलापूर जिल्ह्यातील मारदी या गावात स्त्री जातीचा माळढोक पक्षी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला. वनविभागाने याबाबतचा एक व्हिडिओ विभागाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केला आहे.
मार्च ते सप्टेंबर हा माळढोकसाठी प्रजननाचा कालावधी असतो. गवताळ प्रदेश हा मुख्य अधिवास असलेल्या माळढोक पक्षी आणि इतर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी माळढोकाची नोंद ही एक आशादायक बाब आहे.
यामुळे पक्षी संवर्धन कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.